चिपळुणात हृदयरोग, मधुमेह तपासणी शिबिर

0

चिपळूण : जागतिक हृदयरोग दिनाच्या पार्श्वभूमीवर हेल्प फौंडेशन चिपळूणने हदयरोग व मधुमेह तपासणी शिबिर आयोजित केले आहे. या शिबिरांतर्गत सर्व तपासण्या माधवबाग चिपळूणतर्फे होणार आहेत. हे शिबिर दि. २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांतर्गत आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती किती आहे याची खास करुन तपासणी केली जाईल. याशिवाय रक्तदाब, तापमान, नाडी परीक्षण, शरीरातील ऑक्सिजन प्रमाण, बॉडी मास इंडेक्स,साखरेचे प्रमाण आदी तपासणी केली जाईल. या सर्व तपासण्या मोफत असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासह एमआयबी पल्स अॅप आणि हेल्थ कार्डही आपणास दिले जाईल. या मोफत शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here