एकनाथ खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी? जयंत पाटील म्हणतात…

0

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत जाण्याची चर्चा आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या नंतर खडसेंच्या पक्ष प्रवेशाविषयी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण देताना, खडसेंबाबत कोणतीही चर्चा न झाल्याचं सांगितलं. जयंत पाटील म्हणाले, ‘एकनाथ खडसे यांच्याविषयीची कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झाली नाही. राष्ट्रवादीच्या बैठकीत जळगाव जलसिंचन प्रकल्पाबाबत चर्चा झाली’. एकनाथ खडसे यांच्या नाराजीबाबत ते ज्या पक्षात आहेत त्या पक्षाने विचार करावा, असा सल्ला जयंत पाटील यांनी भाजपला दिला. तसंच भविष्यात खडसे राष्ट्रवादीत येतील का, या प्रश्नावर जयंत पाटील यांनी, राजकारणात जर-तरला फार महत्व नसते, असं म्हणत उत्तर देणं टाळलं.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:41 PM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here