वेळवंडमध्ये महिला उद्योग भवनाचे भूमिपूजन

0

रत्नागिरी : तालुक्यातील वेळवंड येथील गावडेवाडीत महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी गावडेवाडी ग्रामस्थ आणि बचत गट यांच्या माध्यमातून उभ्या राहणाऱ्या महिला उद्योग केंद्राचे भूमिपूजन मंगळवारी पंचायत समिती सदस्य सौ. साक्षी रावणंग यांच्या हस्ते झाले. कोरोनाप्रतिबंधक नियम लक्षात घेऊन भूमिपूजन करण्यात आले. गावडेवाडी ग्रामविकास सेवा संघ, मुंबई व स्थानिक ग्रामस्थ यांच्या संकल्पनेतून हे महिला उद्योग भवन उभे राहत आहे. या उद्योग भवनात मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषदेचे बांधकाम व आरोग्य सभापती महेश म्हाप, जि. प. सदस्य परशुराम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्यात येणार आहेत, असे यावेळी सांगण्यात आले. पापड, अगरबत्ती, मेणबत्ती, पोहे, विविध प्रकारची लोणच, कागदी पत्रावळ, भाजीपाला इत्यादी व्यवसाय तेथे सुरू करण्यात येणार आहेत. लोकवर्गणीतून अनेक मंदिरे उभी राहिली, पण लोकवर्गणीतून उभे राहणारे तालुक्यातील पहिलेच उद्योग भवन आहे. यासाठी रत्नू नानू डांगे यांनी ग्रामविकास सेवा संघाला 16 गुंठे जागा बक्षीस पत्राने दिली त्यांचा सौ साक्षी रावणंग यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. इमारतीचे बांधकाम वाडीतील ग्रामस्थच करणार आहेत. प्रत्येक महिलेने यासाठी एक हजार रुपयांचे तर विनोद गावडे, विजय देवजी गावडे, चेतन गावडे यांनी आर्थिक सहकार्य केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:12 PM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here