कोल्हापुर येथे झालेल्या गोलमेज परिषदेत मराठा समाजाने मांडले ‘हे’ महत्वाचे ठराव

0

◼️ मराठा आरक्षणासाठी १० ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

कोल्हापूर : सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा बांधव पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. मराठा समाजातर्फे राज्यभर आंदोलनं केली जात आहेत तर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी कोल्हापुरात आज (बुधवारी) राज्यस्तरीय मराठा गोलमेज परिषद झाली. मराठा आरक्षणासाठी येत्या 10 ऑक्टोबर रोजी ‘महाराष्ट्र बंद’ करण्यात येणार असल्याची घोषणा मराठा नेत्यांनी केली आहे. आज झालेल्या मराठा समाज गोलमेज परिषदेत हा निर्णय घेण्यात आला. आमच्या मागण्या मान्य झाल्यास महाराष्ट्र बंद मागे घेण्यात येईल, असंही यावेळी स्पष्ट करण्यात आलं.

या गोलमेज परिषदेला अनेक मराठा संघटनांच्या नेत्यांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावली आहे. या परिषदेत मराठा समाजाच्या वतीने १५ ठराव मांडण्यात आले आहेत.

मराठा समाजाचे ‘१५ ठराव’ :

◼️ मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयातील अंतरिम स्थगिती उठवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.

◼️ मराठा समाजाच्या मुलामुलींचे चालू आर्थिक वर्षांपासून फी परतावा शासनाकडून मिळावा.

◼️ केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले. त्याचा लाभ मराठा समाजाला मिळावा.

◼️ महाराष्ट्र सरकारकडून करण्यात येणाऱ्या मेगा भरतीला स्थगिती द्यावी.

◼️ सारथी संस्थेला 1000 कोटींची आर्थिक तरतूद करावी.

◼️ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 1000 कोटींची तरतूद करावी.

◼️ राज्यातल्या सर्व जिल्ह्यात मराठा समाजातील मुलामुलींसाठी वसतिगृह तयार करावी.

◼️ मराठा समाजातील आंदोलकांवरील गुन्हा तत्काळ मागे घ्यावे.

◼️ मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या कुटुंबांना आर्थिक मदत आणि नोकरी मिळावी.

◼️ राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे.

◼️ स्वामिनाथन आयोगाची अमंलबजावणी करावी ही मागणी.

◼️ अरबी समुद्रातील शिवस्मारकाचे काम तातडीने सुरू करावे.

◼️ राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी.

◼️ कोपर्डी प्रकरणातील दोषींच्या शिक्षेची अमंलबजावणी करावी.

◼️ राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी 500 कोटींची तरतूद करावी.

…तर थोबाड फोडो आंदोलन

‘आम्ही बंदची हाक दिली आहे. त्याआधीच सरकारने या ठरावांची अमलबजावणी करावी. नाही तर 10 तारखेनंतर आम्ही थोबाड फोडो आंदोलन करू,’ असा इशारा विजयसिंह महाडिक यांनी दिला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:19 PM 23-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here