राष्‍ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का, अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर

0

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर-धक्के बसत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि आमदार एकापाठोपाठ शिवसेना किंवा भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. राष्ट्रवादीचा गड मानला जाणाऱ्या रायगड जिल्‍हयात सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्‍का बसण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दिग्गज नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे व श्रीवर्धनचे विद्यमान आमदार अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. अवधूत तटकरे यांनी गुरुवारी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांच्यासमवेत अनिल तटकरे सुद्धा उपस्थित होते. दरम्यान, अवधूत तटकरे यांनी याआधी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तेव्हापासूच त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता अवधूत तटकरे शिवसेनेत जाणार, हे जवळपास निश्चित झाले आहे. पण, त्यांनी येत्या दोन दिवसात आपली राजकीय भूमिका स्पष्ट करण्याचे संकेत दिले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here