फिट इंडिया उपक्रमात पंतप्रधान मोदी आज संवाद साधणार; विराट कोहली, मिलिंद सोमण यांचाही सहभाग

0

नवी दिल्ली : फिट इंडिया मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फिटनेसविषयी जनजागृती करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, मिलिंद सोमण आणि प्रसिद्ध आहारतज्ज्ञ रुजुता दिवेकर यांच्यासोबतच अनेक व्यक्तींसोबत संवाद साधणार आहेत. डिजिटल माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या फिट इंडिया संवादामध्ये सहभागी झालेल्यांना पंतप्रधान मोदी तंदुरुस्ती आणि आरोग्याविषयी मार्गदर्शन करतील आणि आपल्या फिटनेस प्रवासाचे अनुभव देखील शेअर करतील. कार्यक्रम दुपारी 12 वाजता होणार आहे. www.pmindiawebcast.nic.in या संकेतस्थळावरून या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

देशात लोकांना आरोग्याप्रती जागरूक करण्याच्या हेतूने राष्ट्रीय क्रिडा दिनानिमित्त गेल्या वर्षी ‘फिट इंडिया मोहिमे’ची सुरुवात करण्यात आली होती. फिट इंडिया मोहिमेंतर्गत गेल्या वर्षभरापासून देशात विविध कार्यक्रम जसं ‘द फिट इंडिया फ्रिडम रन’, ‘प्लॉग रन’, ‘सायक्लोथॉन’, ‘फिट इंडिया वीक’, ‘फिट इंडिया स्कूल सर्टिफिकेट’चं आयोजन करण्यात आलं होतं.
अधिकृत निवेदनानुसार, पंतप्रधान निरोगी जीवनाचे महत्त्व यावर आपले विचार मांडतील. तसेच पंतप्रधानांनी घेतलेल्या पुढाकाराने सुरु करण्यात आलेला फिट इंडिया संवाद भारताला ‘फिट राष्ट्र’ तयार करण्याच्या योजनेत नागरिकांना जोडण्यासाठी व्यायामाचा एक भाग आहे. निवेदनात म्हटले आहे की, ‘नागरिक गंमतीदार, सोप्या आणि अत्यंत किफायतशीर मार्गाने तंदुरुस्त राहू शकतात. तसेच, तंदुरुस्ती हा भारतीयांच्या जीवनाचा महत्वाचा भाग बनला पाहिजे, यासाठीच फिट इंडिया अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. आता आज होणाऱ्या संवादामार्फत याला आणखी मजबूती देण्यात येईल.’

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:12 AM 24-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here