दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस २६ सप्टेंबरपासून धावणार

0

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेली दादर-सावंतवाडी एक्स्प्रेस दि. २६ सप्टेंबरपासून कोकणवासीयांच्या सेवेत रुजू होणार आहे. कोविड-१९च्या बंधनांमुळे ही गाडी पूर्णपणे आरक्षित धावणार असून तुतारी एक्स्प्रेस ऐवजी विशेष गाडी म्हणून धावणार आहे. ही गाडी ३१ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी वेळापत्रकानुसार तर त्या नंतर दि.१नोव्हेंबरपासून पुढील सूचना मिळेपर्यंत ती नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहे. ‘कोरे’च्या वेळापत्रकानुसार दादरहून रात्री १२ वा. ५ मिनिटांनी सुटून त्याच दिवशी दुपारी १२ वा. २० मिनिटांनी सावंतवाडीला पोहचेल. दरम्यान आज दि. २४ सप्टेंबरपासून या गाडीसाठी आरक्षण खुले होत असल्याचे कोकण रेल्वेचे एल.के. वर्मा यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:41 AM 24-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here