रत्नागिरी : टर्फ क्रिकेट क्लब कांदवली आयोजित दही हंडी निम्मित मुले मुली मिक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नुकतेच मुंबई, कांदवली टर्फ मैदानात आयोजित केली होती. या मुले मुली मिक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरीच्या मुनाफ गर्ल महिला संघाने विजेतेपद पटकावले. मीरा रोड संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विजेता मुनाफ गर्ल संघाला ११ हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरविण्यात आले. तर उपविजेता मीरा रोड संघाला ६ हजार रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले. उत्कृष्ट फलनदाज मुनाफ गर्ल संघाची प्रियांका पारकर, महिला मालिकावीर दर्शना पवार, उत्कृष्ट गोलंदाज निखिल पाटील, पुरुष मालिकावीर यतीराज देवरूखे याना चषक देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत विजेता मुनाफ गर्ल संघाचे अभिनंदन मुनाफ भाटकर, दीपक मोरे, गिरीश कोचरेकर यांनी अभिनंदन केले आहे.
