गुहागर तालुक्यातील पिकांच्या रोगांची अधिकाऱ्यांकडून पाहणी

0

गुहागर : गुहागर तालुक्यातील भातपिकावरील करपा रोग नियंत्रणात आणण्यासाठी बुरशीनाशक फवारण्याची सूचना आणि झालेल्या नुकसानीची भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी गुहागर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आली होती. त्यावर तालुका कृषी अधिकारी अभिजित गडदे व सहकाऱ्यांनी शेताच्या बांधावर जाऊन तालुक्यातील भात व नाचणी पिकाची पाहणी केली. तसेच आवश्यक तेथे बुरशीनाशक औषध फवारणीच्या सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत. त्यांच्यासमवेत काताळे गावात शेत पिकाची पाहणी करताना नामदेव बारस्कर, भिकू बारस्कर, सुधाकर बारस्कर, दत्तराम कुळे, सूरज बारस्कर, भाजप तालुका चिटणीस मधुकर असगोलकर आदी शेतकरी उपस्थित होते. गुहागर तालुक्यातील सर्व प्रकारातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी श्री. गडदे यांनी केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:24 PM 24-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here