चिपळूण : ग्लोबल चिपळूण टूरिझम यांच्य वतीने दि. २७ सप्टेंबर रोजी धामणवणे येथे जागतिक पर्यटन दिन साजरा करण्यात येणार आहे. दुपारी ३:३० वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी पर्यटन दिनाच्या निमित्ताने ‘कोरोनामुळे पर्यटनावर झालेले दुष्परिणाम व त्यावरील उपाययोजना’ याबाबत पर्यटन प्रेमींमध्ये चर्चा घडविण्यात येणार आहे. शासनाकडे पर्यटन वृद्धीसाठी कराव्या लागणाऱ्या मागण्या या विषयावर संवाद साधला जाणार आहे. चिपळूण परिसरात रोजगार निर्मितीसाठी पर्यटन व्यवसाय वाढणे महत्त्वाचे आहे त्यामुळे या कार्यक्रमात पर्यटन प्रेमी अभ्यासकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रीराम रेडीज यांनी केले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:41 PM 25-Sep-20