अमेरिकेच्या निवडणुकीत ट्रम्प यांना होतोय मोदींच्या मैत्रीचा फायदा?

0

वॉशिंग्टन : अमेरिकेत तीन नोव्हेंबरला होणाऱ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणूक प्रचारात कोरोना महामारी, वंशवाद आणि बेरोजगारीसारख्या मुद्द्यांबरोबरच मोदी फॅक्टरचाही प्रभाव दिसत आहे. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाकडून राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प तर डेमोक्रेटिक पक्षाकडून माजी उपराष्ट्रपती जो बिडेन मैदानात आहेत. ट्रम्प आल्या निवडणूक प्रचारात भारतीय-अमेरिकन समुदायाला आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या मैत्रीचा वारंवार परिचय करून देत आहेत. नुकत्याच आलेल्या एका निवडणूक सर्व्हेमध्ये ट्रम्प यांना मोदींबरोबर असलेल्या मैत्रीचा फायदा होतानाही दिसत आहे. ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारात कार्यरत असलेल्या एका गटाच्या सर्व्हेमध्ये दावा करण्यात आला आहे, की भारतीय अमेरिकन मतदारांचा अधिकांश कल डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे आहे. सर्व्हेनुसार, बिडेन यांच्या तुलनेत ट्रम्प यांना भारतीय अमेरिकन नागरिकांची अधिक मेते मिळण्याची शक्यता आहे. याचे प्रमुख कारण ट्रम्प आणि मोदी यांची मैत्र आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

ट्रम्प व्हिक्ट्री इंडियन अमेरिकन फायनान्स कमिटीचे सह-अध्यक्ष अल मेसन यांच्या सर्व्हेनुसार, ज्या भारतीय अमेरिकन मतदारांनी गेल्या निवडणुकीत डेमोक्रेट उमेदवाराला मतदान केले होते, त्यातील किमान 50 टक्के मतदार, यावेळी ट्रम्प यांना साथ देतील. या सर्वेत, भारतीय अमेरिकन नागरिकांची पसंती ट्रम्प यांना असल्यासंदर्भातील 12 मुद्दे सांगण्यात आले आहेत.

ट्रम्प यांच्याकडे कल असल्याची कारणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मैत्री आणि भारताशी असलेले दृढ संबंध

जागतिक स्तरावर चीनला बाजूला सारण्यास मोदी-ट्रम्प जोडी सक्षम

भारताच्या अंतर्गत गोष्टीत दखल न देणे

जम्मू-काश्मीर आणि दहशवादासारख्या प्रश्नांवर भारतीच्या बाजूने उभे राहणे

भारताचे समर्थन करणे आणि चीनविरोधात लढाई झाल्यास मदतीचे आश्वासन

ट्रम्प नसल्यास चीन भारताविरोधात युद्ध पुकारण्याची शक्यता

जागतिक स्तरावर भारताचा दर्जा ऊंचावण्यात ट्रम्प यांचा स्पष्ट दृष्टिकोन

चीनच्या विस्तारवादी भूमिकेविरोधत ट्रम्प यांची स्पष्ट नीती

युद्धाऐवजी शांततेच्या मार्गाने वाद सोडविण्यासाठी प्रयत्न करणे.

चीनविरोधात वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चेबांधणी करणे.

कोविड-19 महामारीच्या आधीपर्यंत अमेरिकेत आर्थिक पुनरुद्धाराचा प्रयत्न

कोरोना महामारीचा योग्य प्रकारे सामना करणे आणि सहकार्य करणे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:20 PM 25-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here