धमक्यांच्या अनुषंगाने ना. उदय सामंत यांच्या सुरक्षेत गृह विभागाने केली वाढ

0

रत्नागिरी : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मागील काही काळात घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयामुळे समाजकंटकांकडून त्यांना धमक्यांचे फोन येऊ लागले होते. याबाबत पोलिसात रीतसर तक्रार देखील करण्यात आली होती. ना उदय सामंत यांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते म्हणून नेमणूक झाल्यावर त्यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र आता त्यांना आलेल्या धमक्यांच्या अनुषंगाने सुरक्षेत अधिक वाढ करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. आता ना. उदय सामंत यांना वाय प्लस एस्कॉर्टसह दर्जाची वर्गीकृत सुरक्षा पुरवण्यात येणार आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:02 PM 25/Sep/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here