मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आश्वासन

0

मुंबई : माथाडी संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज एपीएमसीमधील माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी सध्याचा ज्वलंत विषय असलेल्या मराठा आरक्षणाच्या विषयावर त्यांनी भाष्य केले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार, असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहे. सरकार मराठा समाजासोबत आहे. मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मराठी माणसाच्या न्याय हक्काची लढाई जिंकणार आहेत. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:18 PM 25-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here