काजू बोर्डाचा प्रस्ताव केंद्र आणि राज्य शासनाला द्या

0

रत्नागिरी : जिल्ह्यात काजू बोर्ड होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र आणि राज्य शासनाला प्रस्ताव द्यावा, अशी मागणी रत्नागिरी जिल्हा गाव विकास समितीचे डॉ. मंगेश कांगणे आणि श्यामकर्ण भोपळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोकण काजू उत्पादन क्षेत्रात अग्रेसर होत आहे. अनेक शेतकरी काजू उत्पादनाकडे वळले आहेत. भविष्यात काजू उत्पादनाचे कोकण हे प्रमुख केंद्र होईल. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात काजू बोर्ड होण्याबाबत जिल्ह्याचे प्रशासकीय प्रमुख म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारला प्रस्ताव पाठविणे आवश्यक आहे. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात गाव विकास समितीचे डॉ. कांगणे व भोपळकर यांनी देवरूख येथील क्रांती व्यापारी संघटनेच्या मागणीला पाठिंबा दर्शवला असून आता प्रशासकीय पातळीवर रत्नागिरी जिल्ह्यात काजू बोर्ड होण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:01 PM 26-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here