CSMT स्थानकाच्या पुनर्विकासासाठी टाटा, अदानींसह ४३ कंपन्या इच्छुक

0

मुंबई : CSMT प्रकल्पाच्या लिलावपूर्व बैठकीचे अध्यक्षस्थान, नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि रेल्वे मंडळाचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी डिजिटल माध्यमातून आज भूषविले. रेल्वेमंडळाच्या पायाभूत सेवा विभागाचे सदस्य, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक तसेच उत्तर रेल्वेचे महाव्यवस्थापक यांनीही या बैठकीत उपस्थिती लावली. भारतभरातील रेल्वेस्थानकांचा पुनर्विकास हा भारतीय रेल्वेचा एक प्रमुख कार्यक्रम आहे. सरकारमार्फत पूर्ण ताकदीनिशी हा कार्यक्रम राबवला जात असून PPP म्हणजे खासगी सार्वजनिक भागीदारीच्या माध्यमातून खासगी उद्योजकांचाही सहभाग यात घेतला जात आहे. आज झालेल्या लिलावपूर्व बैठकीला उद्योगजगताकडून उदंड प्रतिसाद मिळाला तसेच विकासक आणि निधीसंस्था यांना गुंतवणुकीच्या दृष्टीने यात मोठे स्वारस्य असल्याचे दिसून आले.या बैठकीत लिलावाची बोली लावू शकणारे 43 संभाव्य बिडर्स सहभागी झाले. यात अदानी समूह, टाटा प्रोजेक्ट्स लि., एल्देको, GMR समूह, एस्सेल समूह, लार्सन अँड टुब्रो इत्यादींचा, तर वास्तुविशारदांपैकी BDP सिंगापूर, हाफिज कॉन्ट्रॅक्टर आदींचा, निधी संस्थांपैकी ऍन्करेज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट होल्डिंग, ब्रूकफील्ड यांचा तर सल्लागार कंपन्यांपैकी JLL, बोस्टन कन्सल्टन्सी समूह, केपीएमजी इत्यांदींचा तर दूतावासांपैकी ब्रिटिश उच्चायुक्तांचा समावेश होता.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:24 PM 26-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here