देशात 24 तासात 82,170 नवे रुग्ण; कोरोना बाधितांचा आकडा 60 लाखांवर

0

नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून, हा आकडा आता 60 लाखांच्या पुढे गेला आहे. 60 लाख कोरोनाग्रस्त असणारा भारत हा जगातील दुसरा देश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांमध्ये 82,170 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. यासोबतच एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 60,74,702 झाली आहे. मागील 24 तासात 1,039 लोकांचा व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 95542 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे, देशातील 50 लाखांपेक्षा अधिक रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत 50,16,520 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मागील 24 तासात 74,893 रुग्ण बरे झाले आहेत. तर उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 9,62,640 आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:55 AM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here