कोकण रेल्वे मार्गावरून गणेशोत्सवानिमित्त सहा विशेष एक्स्प्रेस

0

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे मार्गावरून गणेशोत्सवानिमित्त सहा विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरी यादरम्यान सहा विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येतील. यासह दादर ते सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेसला ४ जादा डबे जोडण्यात येतील. लोकमान्य टिळक टर्मिनस ते रत्नागिरीदरम्यान तीन विशेष एक्स्प्रेस ३० आॅगस्ट ते १ सप्टेंबर या कालावधीत सुटतील. या तिन्ही दिवशी ही एक्स्प्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सायंकाळी ८.५० वाजता सुटून रत्नागिरी येथे ६.४० वाजता पोहोचेल. रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनस तीन विशेष एक्स्प्रेस ३१ आॅगस्ट ते २ सप्टेंबर या कालावधीत सुटतील. या तिन्ही दिवशी ही एक्स्प्रेस रत्नागिरी येथून सकाळी ८ वाजता रवाना होऊन लोकमान्य टिळक टर्मिनस येथे सायंकाळी ४.२५ वाजता पोहोचेल. या गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, मडगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबा दिला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here