कोरोना पार्श्वभूमीवर गणपतीपुळे मंदिरातील उंदीरही बंदीस्थ

0

रत्नागिरी : गणपतीपुळेतील श्रींच्या दर्शनाला शेकडो भाविक येत आहेत. श्रींचे मुखदर्शन होत नसल्याने कुणी कळसाचे तर कुणी मंदिराबाहेरील उंदराच्या दर्शनावर समाधान मानतात. पण इथेही कोरोनाने पाठ सोडलेली नाहीच. उंदराच्या कानात सांगण्यासाठी तोंड जवळ नेत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. या भितीने मंदिर प्रशासनाने उंदिराभोवती लोखंडी रेलींग केले आहे. आता मंदिराच्या दरवाज्याबाहेर उभे राहून दुधाची तहान ताकावर भागवल्याप्रमाणे हात जोडून निघून जात आहेत. उंदीर कोरोनाचा प्रसारक ठरु नये आणि भक्तांच्या आरोग्य रक्षणासाठी मंदिर प्रशासनाने उंदीराच्या भोवती लोखंडी रेलींग केले आहे. सध्या गणपतीपुळेत तरुण वर्गच मोठ्याप्रमाणात येत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:07 PM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here