जमीयते उल्मा ए हिंदच्यावतीने घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला प्रतिसाद

0

रत्नागिरी : रत्नागिरी येथील जमीयत उल्मा ए हिंद या संस्थेने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयातील रक्तपेढी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. कोरोना पार्श्वभूमीवर अचानक लागणारा रक्तसाठा रक्तपेढीत उपलब्ध असावा यासाठी या संस्थेने या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला रक्तदात्यांनी देखील उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान करुन या सामाजिक सेवेत सहभाग घेतला. यावेळी संस्थेचे मुफ्ती तौफिक सारंग, सुहेल मुकादम, मन्सूर काझी, इम्रान सय्यद, मौलाना बगदादी आदी उपस्थित होते

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:54 AM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here