भाजपातर्फे मोकाट गुरांचा बंदोबस्त करण्यासाठी अनोखे आंदोलन

0

रत्नागिरी : रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टी तर्फे आज अनोखे आंदोलन करण्यात आले. १५ दिवसांपुर्वी रत्नागिरी शहरातील मोकाट गुरे आणि उनाड कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा गुरे पकडुन कार्यालयात सोडु असा इशारा देण्यात आला होता. मुख्याधिकारी यांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश देऊनसुद्धा मोकाट गुरांचा आणि कुत्र्यांचा त्रास रत्नागिरी शहरातील नागरीकांना सहन करावा लागत आहे. गुरे पकडण्याची मोहीम राबविण्याबाबत नगरपरिषद प्रशासन आणि प्रमुख पदाधिकारी उदासीन असल्यामुळे भाजपा रत्नागिरी शहराच्या वतीने आज शहरभर रस्त्यात ठाण मांडुन बसलेल्या गुरांच्या गळ्यात अकार्यक्षम लोकप्रनिनिधी आणि प्रशासन यांचा जाहीर निषेध असल्याचे बोर्ड अडकविण्यात आले आणि मारुतीमंदीर येथे भाजपा शहर कार्यकर्त्यांनी जनतेच्या हीताची कामे करा अन्यथा खुर्च्या खाली करा, रत्नागिरी नगरपरिषद सत्ताधाऱ्यांचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. नगरपालिका प्रशासन आणि कारभाऱ्यानी मोकाट गुरे आणि उनाड कुत्रे यांच्यावर तीव्र मोहीम राबवुन बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकांकडुन जोर धरत आहे. हे आंदोलन करताना श्री राजीव कीर, श्री भैया मलुष्टे, श्री प्रशांत डिंगणकर, श्री अशोक वाडेकर, श्री ययाती शिवलकर, श्री बंड्या भाटकर, श्री मनोज कीर, श्री ज्योतीप्रभा पाटील असे उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:30 PM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here