शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रत्नागिरीत हॉटेल्सवर फडकवला लाल झेंडा

0

रत्नागिरी : हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळण्यासाठी जिल्ह्यातील हॉटेल व्यावसायिकांनी रविवारी पर्यटन दिनी हॉटेल्सवर लाल झेंडा फडकविला. याद्वारे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, हॉटेल व्यवसायाला पूर्ण परवानगी मिळेपर्यंत हा झेंडा हॉटेल्सच्या बाहेर फडकत ठेवण्यात येणार आहे. हॉटेल असोसिएशनचे सचिव सुनील देसाई, रवींद्र घोसाळकर, उदय लोध यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. रत्नागिरीतील हॉटेल अलंकार येथे सुनील देसाई, हॉटेल सफारी येथे यश राणे यांनी झेंडा फडकविला. या आंदोलनाचा मुख्य उद्देश शासनाचा निषेध करण्याचा नाही. सरकारने या व्यावसायिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी हालचाल करावी व व्यावसायिकांना दिलासा द्यावा, यासाठी हे आंदोलन करण्यात आले. कोणावरही बंधन न ठेवता ज्यांना आंदोलनाची भूमिका पटली आहे त्यांनी स्वेच्छेने हॉटेल्सबाहेर झेंडा फडकवावा, असे आवाहन हॉटेल असोसिएशनचे सचिव सुनील देसाई यांनी केले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:05 PM 28-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here