विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू

0

रत्नागिरी : अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केलेल्या तरुणाचा उपचारांदरम्यान जिल्हा शासकिय रुग्णालयात सोमवारी मृत्यू झाला. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रुपेश कृष्णा डांगे (२९,रा. डांगेवाडी हातखंबा,रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाऊ दिनेश कृष्णा डांगे याने ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार रुपेशने रविवार २७ सप्टेंबर रोजी रात्री राहत्या घरी अज्ञात कारणातून विषारी औषध प्राशन केले. काही वेळाने त्याला अस्वस्थ वाटू लागल्यावर नातेवाईकांनी त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, उपचारांदरम्यान रुपेशचा मृत्यू झाला. याबाबत अधिक तपास पोलिस हे. कॉन्स्टेबल झगडे करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:54 AM 29-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here