महावितरण विरोधात मनसेचे उपोषण

0

संगमेश्वर : रत्नागिरी जिल्ह्यातील वीज ग्राहकांना लॉकडाऊन काळातील पहिल्या तीन महिन्यांची वीजबिल माफी मिळावी नाहीतर मागील ४० वर्षांपासुनचे विजेचे खांब व वीजवाहिन्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीत आहेत, त्यांचे भाडे शेतकऱ्यांना द्या या प्रमुख मागणीकरिता मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी कडवई येथे सोमवारी सकाळी ११ वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला पंचक्रोशीतून वाढता पाठिंबा मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वीजग्राहकांना लॉकडाऊन काळातील वीजबिल माफी झाली पाहिजे, वाढीव वीज दर रद्द झाला पाहिजे तसेच व्यावसायिकांना सरासरी वीजबिल न देता त्यांच्या वापराप्रमाणे वीज बिल देण्यात यावीत, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गेल्या दोन महिन्यांपासून पाठपुरावा सुरू आहे. मात्र, प्रशासन किंवा वीज वितरण कंपनी यांच्याकडून याबाबत योग्य कार्यवाही झाली नाही. यामुळेच सोमवारपासून हे आंदोलन सुरू करण्यात आले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:09 AM 29-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here