सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म बफरला लोकल धडकली

0

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर लोकल बफरला जावून धडकली. आज (ता.३०) दुपारच्या सुमारास हा अपघात घडला. सुदैवाने या अपघातात कोणतीही दुर्घटना घडली नाही. लोकलमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. शुक्रवारी दुपारच्या सुमारास लोकल गाडी सीएसएमटी स्थानकातील फ्लॅटफॉर्म क्रमांक ३ वर आली. यावेळी या लोकलची बफरला धडक झाली. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी, रेल्वे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर फ्लॅटफॉर्म ३ वरून सर्व वाहतूक बंद करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वे स्थानकात एकच गोंधळ उडाला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here