महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूक? पाटलांच्या वक्तव्यावर संजय राऊत म्हणतात…

0

मुंबई : संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या भेटीनंतर राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे. शिवसेना पुन्हा भाजपसोबत युती करणार का? अशा चर्चेला उधाण आलं असताना राज्यात मध्यावधी निवडणुका होऊ शकतात, असं वक्त्यव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. आता चंद्रकांत पाटील यांच्या मध्यावधीच्या निवडणुकीच्या वक्तव्याचं शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी खंडन केलं आहे. राज्यातलं महाविकास आघाडी सरकार ५ वर्ष पूर्ण करणार, असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच निवडणुका कधी घ्यायच्या हे निवडणूक आयुक्त ठरवतात, चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणूक आयोगाने एखादी जबाबदारी दिली असेल तर माहित नाही, असा टोला संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:04 PM 29-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here