घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनासाठी ग्रा. पं. ना मिळणार निधी

0

रत्नागिरी : स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) अंतर्गत घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या असून, आता कुटुंबानुसार ग्रामपंचायतींना निधी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्राथमिक टप्प्यात या योजनेसाठी ५० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जीवनमानाचा दर्जा सुधारून शाश्वत स्वच्छता राखणे हे केंद्रपुरस्कृत स्वच्छ भारत अभियान योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात राज्यातील सर्व ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यानंतर आता सर्व ग्रामपंचायतींमध्ये घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवण्यात येत आहे. त्यादृष्टीने निधीही दिला जात आहे. या योजनेंतर्गत शासनाने १९ जुलै २०१९ रोजी एक सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. या मार्गदर्शक सूचनेत या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना कुटुंब संख्या आधारित अर्थसहाय्य करण्यात येणार आहे. त्यानुसार १५० | कुटुंबसंख्येसाठी७लाख,३०० पर्यंत कुटंब संख्येसाठी १२ लाख,५०० पर्यंत कुटुंब संख्येसाठी १५ लाख व ५०० पेक्षा जास्त कुटुंब संख्येसाठी २० लाख निधी मिळणार आहे. यामध्ये सार्वजनिक कंपोष्ट खड्डे, गांडुळ खत निर्मिती प्रकल्प सार्वजनिक बायोगॅस प्रकल्प, कमी खर्चाचे मलनि:स्सारण प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन व त्यावरील प्रक्रिया शोषखड्डे, सांडपाण्याचा पुनर्वापर, कचरा गोळा करणे, वेगळा करणे व त्यावर अंतिम प्रक्रिया करणे इत्यादी उपक्रम राबवले जाणार आहेत. जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे. या योजनेची माहिती देण्यासाठी जि. प.च्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात जिल्हयातील सर्व गट विकास अधिकारी, सहाय्यक गट विकास अधिकारी, उप अभियंता, शाखा अभियंता (ग्रामीण पाणी पुरवठा), विस्तार अधिकारी (पंचायत), सहाय्यक प्रकल्प अधिकारी (नरेगा) यांची कार्यशाळा पार पडली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी, आंचल गोयल यांनी सांडपाणी व घनकचऱ्याचे महत्व सांगताना रत्नागिरी जिल्हयातील ग्रामपंचायती विखुरलेल्या, दाट लोकवस्ती व समुद्र किनारी आहेत. अशा गावांमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया राबवावी. तसेच वैयक्तिक पातळीवर नॅडेप, शोषखड्डे व व्हर्मी टँक महात्मा गांधी रोजगार हमी योजना (नरेगा) असे आवाहन केले. कार्यशाळेच्या प्रास्तविकामध्ये ए.बी.मरभळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता), जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन करण्याकरिता सुधारित मार्गदर्शक सुचनांची माहिती दिली. तसेच संदेशम्हादलेकर, अभियांत्रिकी तज्ज्ञ यांनी सांडपाणीवघनकचरा प्रक्रियेबद्दल तांत्रिक मार्गदर्शनपर माहिती दिली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रभाकर कांबळे, पाणी गुणवत्ता निरिक्षक यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here