गुहागर : तालुक्यातील पाटपन्हाळे ग्राम पंचायतीतर्फे तालुक्यात कोरोना संक्रमणाच्या काळात सामाजिक भावनेतून कामगिरी बजावणारे तालुक्यातील डॉक्टर्स, परिचारिका, पोलिस, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, पत्रकार, आशा, तालुक्याचे अधिकारी, व्यापारी आदींचा कोविड योद्धा म्हणून आज दि. ३० सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या सभागृहात सन्मान करण्यात येणार आहे, असे सरपंच संजय पवार यांनी सांगितले. ग्रामपंचायतीतर्फे प्रशस्तिपत्र व सन्मानचिन्ह देऊन कोविड योद्ध्यांचा गौरव केला जाणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:08 AM 30-Sep-20