चरवेली जवळ कारला अपघात, एक ठार

0

रत्नागिरी : तालुक्यातील चरवेली येथील वळणात इको कार १५० फूट दरीत गेल्याने वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२ वा. सुमारास घडली. भगवान बाबाजी वाडकर (८५, रा. विक्रोळी,मुंबई) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. मंगळवारी पहाटे मालवण येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी सुनील वाडकर आपल्या ताब्यातील इको कारमधून वडील भगवान वाडकर, भाऊ अनिल वाडकर, कृष्णा रामचंद्र वाडकर यांना घेऊन निघाले होते. चरवेलीतील वळणावर आले असता सुनील वाडकर यांचा कारवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या खाली दीडशे फूट दरीत कोळसली. यात भगवान वाडकर यांचा जागीच मृत्यू झाला तर सुनील वाडकर, अनिल वाडकर, कृष्णा वाडकर हे जखमी झाले. त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर हातखंबा पोलिस मदत वाहतूक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तर पोलिस निरीक्षक सुरेश कदम, पोलिस हवालदार संतोष कांबळे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. या अपघातप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:33 AM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here