लोककलावंतांना आर्थिक सहकार्य द्या; डॉ. नातू यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0

गुहागर : कोकणातील अनेक कलाकार भजन व गणपतीमधील जाखडीनृत्य असे स्वतंत्र कार्यक्रम राबवून अर्थार्जन करीत असतात. मात्र कोरोनाच्या नियमांमुळे श्रावण महिन्यात व गणपतीमध्ये सार्वजनिक कार्यक्रम करणाऱ्यावर पूर्ण बंदी होती. तसेच घरगुती कार्यक्रमांनाही बंदी असल्याने या कलाकारांना अर्थार्जन झाले नाही. मार्चपासून लॉकडाऊन असल्याने नमनाचे कार्यक्रमही ऐन हंगामात झाले नाहीत. त्यामुळे कोकणातील या लोककलावंतांना आर्थिक सहकार्य म्हणून कोविड-१९ अंतर्गत विशेष निधी मिळावा, अशी मागणी माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here