महाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबियांचे तातडीने पुनर्वसन करावे : दरेकर

0

मुंबई : महाड इमारत दुर्घटनेतील कुटुंबांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करणारे पत्र मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. महाड येथील तारीक गार्डन नावाची पाच मजली इमारत २४ ऑगस्ट रोजी कोसळली आणि अनेकांनी प्राण गमावले. याच इमारतीत राहणारी सत्तेचाळीस कुटुंबे बेघर झाली. महाड दुर्घटनेची चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली असली तरी या बेघर कुटुंबीयांचा प्रश्न तितकाच महत्त्वाचा आहे. नवीन घर बांधण्याची आर्थिक क्षमता या लोकांकडे नाही. त्यामुळे शासनानेच त्यांचे पुनर्वसन करावे असे, असे प्रवीण दरेकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:03 PM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here