आयपीएलमध्ये राशिद खानची जादू

0

मंगळवारी (२९ सप्टेंबर) आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद संघात सामना झाला. या सामन्यात हैदराबादने दिल्लीला १६३ धावांचे आव्हान दिले होते. ह्या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्ली संघ २० षटकात ७ विकेट्स गमावत १४७ धावाच करु शकला. त्यामुळे हैदराबादने या सामन्यात १५ धावांनी विजय मिळवला. हैदराबादच्या या विजयात राशिद खानचे योगदान महत्त्वाचे ठरले. त्याने या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना १४ धावा देत ३ विकेट्स घेतल्या. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कारही देण्यात आला. राशिदची आयपीएलमध्ये ४ षटकात २० किंवा त्यापेक्षा कमी धावा देण्याची ही १५ वी वेळ होती. त्याने २०१७ मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून म्हणजेच २०१७ च्या आयपीएल मोसमापासून तो सर्वाधिकवेळा एका सामन्यात ४ षटके गोलंदाजी केल्यानंतर २० किंवा त्यापेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज आहे. २०१७ पासून सर्वाधिकवेळा ४ षटके गोलंदाजी केल्यानंतर २० किंवा त्यापेक्षा कमी धावा देणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत राशिद पाठोपाठ सुनील नारायण असून त्याने ८ वेळा अशी कामगिरी केली आहे. तर रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेलने प्रत्येकी ७ वेळा अशी कामगिरी केली आहे. हे दोघेही संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:03 PM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here