गणेशोत्सवाच्या कालावधीत होणार चाकरमान्यांची तपासणी

0

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज झाला असून, जिल्ह्यात आरोग्य तपासणीसाठी २५ पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ३६४ कर्मचारी कार्यरत असणार आहेत. ही पथके ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही पथके असणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर, गणेशोत्सवासाठी मुंबई पुणे तसेच राज्याच्या इतर भागातून मोठया प्रमाणात गणेशभक्त येत असतात. साथीचे आजार,किरकोळ अपघात, तसेच अतितातडीच्या आरोग्य सेवा यासारख्या बाबींसाठी आरोग्य विभागाकडून गणेशोत्सवानिमि त येणाऱ्या चाकरमान्यांच्या तपासणीसाठी जिल्हयाच्या प्रवेशाच्या ठिकाणी तसेच काही रेल्वे स्थानके महत्वाची बसस्थानके आणि महाम र्गावर पोलिस पथके असणाऱ्या ठिकाणी ही पथके कार्यरत ठेवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी सर्वेक्षणही या कालाधित सुरु रहाणार असून संशयित रुग्ण आढळून आल्यास त्यांचेवर त्वरित औषधोपचार करण्यात येणार आहेत. या कालावधित जिल्हयात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पुरेशा प्रम णात औषधसाठा उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सौ.बी.एस.कमलापूरकर यांनी दिली. या कालावधित जिल्हयात या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सर्व प्रकारची दक्षता घेण्यात येत आहे. सदरची पथके दिनांक ३१ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधित कार्यरत रहाणार आहेत. पथकांची ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत. कशेडी घाट, भरणेनाका, पशुराम घाट, उक्ताड नाका, बहादूर शेख नाका , वहाळ फाटा, आरवली, डिंगणी फाटा संगम श्वर एस.टी.स्थानक, देवरुख फाटा , हातखंबा तिठा, पाली, वेरळ, लांजा हायस्कूल समोर, ओणी, राजापूर जकात नाका याव्यतिरिक्त महत्वाची बसस्थानके व रेल्वे स्थानके या ठिकाणी ही पथके कार्यरत रहाणार आहेत. जनतेने या सणाच्या कालावधित आपल्या आरोग्याबाबत दक्ष रहावे, पाणी उकळून व गाळून प्यावे. ताप आलेल्या रुग्णांनी रक्तनमुने त्वरित नजिकच्या सरकारी रुग्णालयातून तपासून घ्यावेत. लेप्टोस्पायरोसिस सारख्या आजारांपासून बचावासाठी योग्य ती काळजी घ्यावी. कोणत्याही आजाराचे रुग्ण आढळून आल्यास जवळच्या शासकिय रुग्णालयात खबर द्यावी असे आवाहन आरोग्य विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्याकडून करण्यात आले आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here