आमदार भास्कर जाधव यांच्या हस्ते होणार रुग्णवाहिकेचे लोकार्पण

0

गुहागर : गुहागरचे आमदार भास्कर जाधव उद्या, १ ऑक्टोबर रोजी गुहागर तालुक्यासाठी दिलेल्या रुग्णवाहिकेच्या लोकार्पण सोहळ्यासाठी गुहागरमध्ये जाणार असून या कार्यक्रमानंतर ते पक्ष कार्यालयात दिवसभर थांबून जनतेच्या अडीअडचणी, विकासाचे प्रश्न समजून घेणार आहेत. कोरोनाचे संकट आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन आमदार श्री. जाधव यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून गुहागर तालुक्यासाठी सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण उद्या सकाळी १०.३० वाजता पंचायत समिती कार्यालयात त्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:55 PM 30-Sep-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here