सर्पदंश झालेल्या महिलेवर तब्बल तेरा तासांनी उपचार

0

राजापूर : अणसुरे येथील सर्पदंश झालेल्या महिलेला जैतापूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात लस उपलब्ध नसल्याने जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर तेरा तासांनी उपचार मिळाले. सुदैवाने तिचा जीव वाचला आहे. गेल्या काही दिवसांपासून भातकापणीच्या कामांना सुरुवात झाली आहे. या कालावधीत लोकांना सर्पदंश, विंचूदंशाचा सामना करावा लागत आहे. अणसुरे येथील एका महिलेला सर्पदंश झाला. तिच्या नातेवाईकांनी त्या महिलेला तत्काळ जैतापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथे लस नसल्याने तेथून त्या महिलेला राजापूरला हलविण्यात आले. राजापूरहून रत्नागिरी आणि त्यानंतर तिला डेरवण येथे उपचारासाठी हलविण्यात आले. यामध्ये सुमारे तेरा तासांचा प्रवास घडला. या प्रवासानंतर तिच्यावर उपचार झाले. नशीब बलवत्तर म्हणून अनर्थ टळला आहे. सर्पदंशासारख्या अन्य आजाराच्या रुग्णांवर स्थानिक पातळीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार होणे अपेक्षित होते. मात्र अशा तातडीच्या सुविधा उपलब्ध नसतील तर, ग्रामीण भागातील आरोग्य सेवा कुचकामी आहे, अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:35 AM 01-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here