असुर्डे येथे घरफोडी; गॅस सिलिंडर, फ्रिजसहित हजारोंचा ऐवज लांबवला

0

चिपळूण : तालुक्यातील असुर्डे पाष्टेवाडी येथील घराच्या पडवीचा दरवाजा तोडून अज्ञाताने गॅस सिलिंडर, स्टीलची शेगडी, टाकी आणि फ्रिज असा हजारोंचा मुद्देमाल लांबवला. याप्रकरणी सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोरीची ही घटना मार्च ते २९ सप्टेंबर २०२० या कालावधीत घडली आहे. याप्रकरणी श्रध्दा शरद नार्वेकर (५२,रा.चाफे धनगरवाडा, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार श्रध्दा नार्वेकर या मुंबईला राहतात. लॉकडाऊन असल्यामुळे मार्च महिन्यानंतर त्या २९ सप्टेंबर रोजी दुपारी ११ वा.सुमारास गावी परतल्या. त्यावेळी त्यांना घराच्या पडवीचा दरवाजा अर्धवट तोडलेल्या अवस्थेत दिसून आला. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांना घरातील सामान चोरीस गेल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने सावर्डे पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास पोलिस हेड कॉस्टेबल गमरे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:25 AM 01-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here