आम्ही तेली समाज युवक संघटना रत्नागिरी आयोजित कोकण विभाग(खुला गट) वक्तृत्व स्पर्धेमध्ये राजस कदम द्वितीय

0

रत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्हामध्ये आम्ही तेली समाज युवक संघटना रत्नागिरी या संघटनेचे संस्थापक सन्मा.श्री.संतोषजी रहाटे साहेब यांनी महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोकण अध्यक्ष श्री.सतीशजी वैरागी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धे चे आयोजन करण्यात आले होते. या ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्यला व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.सध्याच्या कोरोना आपत्कालीन परिस्थिती मध्ये ऑनलाईन स्पर्धे च्या माध्यमातून समाजाला संघटित करून समाज उपयोगी विचार मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम आम्ही तेली समाज युवक संघटना रत्नागिरी या संघटनेने केले. या कार्येक्रम साठी प्रांतिक तैलिक महासभेचे अध्यक्ष तसेच वर्धा चे खासदार सन्मा.श्री.रामदासजी तडस साहेब,माजी ऊर्जा मंत्री सन्मा.श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब,महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघाचे महासचिव सन्मा.डॉ.भूषणजी कर्डीले साहेब,कोकण अध्यक्ष सतीशजी वैरागी साहेब,कार्याध्यक्ष सन्मा.अशोकजी व्यवहारे साहेब,सन्मा.श्री.सुनीलजी चौधरी साहेब,साहित्यिक श्री.अरुणजी इंगवले साहेब, परीक्षक श्री.चंद्रकांतजी झगडे सर,श्री,विनायकजी राऊत सर,श्री.प्रभाकरजी खानविलकर सर,श्री.संतोषजी तेली सर,रत्नागिरी चे जिल्हा अध्यक्ष श्री.रघुवीरजी शेलार साहेब ,श्री संतोष राहटे साहेब यांस सह आम्ही तेली समाज युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी व ज्ञाती बांधव उपस्थित होते.या कोकण विभागातील स्पर्धे मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील कु.राजस अविनाश कदम कुवारबाव रत्नागिरी वय वर्षे 18 याने खुल्या गटा मध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केला.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासंघटनेचे महासचिव श्री.डॉ.भूषणजी कर्डीले साहेब यांनी त्यांच्या मनोगतामध्ये कु.राजस कदम याचे कौतुक केले.युवकांनी समाज युवक संघटने मध्ये अधिकाधिक सक्रीय होऊन आपले योगदान द्यावे असे आवाहन देखील महासचिव डॉ.भूषणजी कर्डीले साहेब यांनी केले.तसेच कु.राजस कदम याने यश संपादन केल्याबद्दल समाजातून अभिनंदन केले जात आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:30 PM 01-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here