पोलीस मित्रांचा करण्यात येणार सत्कार, सोबत देण्यात येणार मानधन : उदय सामंत

0

रत्नागिरी : कोरोना संकटात पोलिसांच्या मदतीला धावणाऱ्या पोलीस मित्रांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तालुक्यातील ६० नागरिक पोलिसांना मदत करण्यासाठी कोरोना संकटात पुढे आले होते. कोरना काळात पोलिसांना त्यांच्या कामात मदत करण्याची मोठी भूमिका या नागरिकांनी पार पाडली होती. याची दखल ना. उदय सामंत यांनी घेतली आहे. ११ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता या ६० पोलीस मित्रांचा सत्कार करण्यात येणार असून सोबत त्यांच्या कार्याला प्रोत्साहन म्हणून प्रत्येकी ५ हजार रुपयांचे मानधन देखील देण्यात येणार असल्याची माहिती ना. उदय सामंत यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:42 PM 01/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here