कोरोना होऊनही नामदार कोरोना योध्याचे काम थांबले नाही

0

रत्नागिरी : कोरोनाची साथ आल्यापासून पायाला चक्र लागल्यासारखी उभ्या कोकणात फिरणारे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांना स्वतःला कोरोनाची लागण होऊनही कामात उसंत घेतल्याचे दिसून येत नाही. दोन दिवसांपूर्वीच ना. सामंत यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याने त्यांनी आपल्या घरीच स्वतःला कॉरंटाईन करून घेतले आहे. मात्र या काळातही ते नागरिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे संवाद साधत असल्याचे पहावयास मिळत आहे. रत्नागिरी, सिधुदुर्ग पासून संपूर्ण कोकण पट्ट्यातील व्यवस्थेवर त्यांची नजर असून नागरिकांना मिळणाऱ्या सुविधांचा ते आढावा घेत असल्याचे दिसून येत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील मुलांच्या परीक्षा मुलांच्या आरोग्याला व सुरक्षिततेला प्राधान्य देऊन घेण्याची मोठी जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आहे. मात्र स्वतःला कोरोनाची लागण होऊनही नागरिकांच्या हितासाठी दिवसरात्र काम करीत असल्याचे ना. उदय सामंत यांच्या कार्यातून पहावयास मिळत आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
06:06 PM 01/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here