गांजा, नशेच्या गोळ्या बाळगल्याप्रकरणी रत्नागिरीतील एकाला अटक

0

रत्नागिरी : अमली पदार्थ तसेच नशा येणाऱ्या गोळ्या आणि सिरप यांचे सेवन आणि विक्री करणाऱ्या दोन संशयितांपैकी एकाला शहर पोलिसांनी बुधवारी शिवखोल घाटी येथून अटक केली. त्याच्याकडून एक दुचाकी, मोबाईल, नशा येणाऱ्या गोळ्यांची चार बंडले आणि नशा येणाऱ्या सिरपच्या ३ बॉटल असा एकूण २६ हजार रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला. राहिद रफिक मुकरी (२५,रा.फोडकर कॉम्प्लेक्स उद्यमनगर, रत्नागिरी) आणि त्याचा साथीदार अबू (रा.गोवंडी, मुंबई) या दोघांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून राहिदला अटक केली आहे. बुधवारी राहिद त्याच्या ताब्यातील दुचाकीच्या डिकीमधून १० ग्रॅम गांजा, नशा येणाऱ्या गोळ्यांची चार बंडले आणि नशा येणाऱ्या सिरपच्या ३बॉटल घेऊन विक्रीसाठी घेऊन जात होता. ही माहिती शहर पोलिसांना मिळताच त्यांनी शिवखोल घाटीत राहिदला अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचा मुंबई येथील साथीदार अबकडून आपण हे सर्व विक्रीसाठी रत्नागिरीत घेऊन आल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सकपाळ करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here