हाथरसच्या घटनेची हायकोर्टाकडून दखल

0

लखनऊ : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाने हाथरसच्या घटनेची स्वत:हून दखल घेतली आहे. उच्च न्यायालयाने घटनेवर चिंता व्यक्त करत युपी सरकार, राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हाथरसचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावली आहे. न्यायमूर्ती राजन रॉय आणि न्या. जसप्रीत सिंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची दखल घेत हा आदेश दिला. हाथरस पोलिसांनी पीडितेशी केलेल्या क्रूर आणि अमानुष वर्तनाबद्दलही हायकोर्टाने राज्य सरकारला जाब विचारला आहे. खंडपीठ येत्या 12 ऑक्टोबर रोजी या प्रकरणी सुनावणी घेणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठानेही हाथरसच्या घटनेवर निर्देश देत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. या घटनेवर न्यायालयाने राज्य सरकारकडून स्पष्टीकरण मागितलं आहे. यासह मुख्य सचिव (गृह), डीजीपी, एडीजी कायदा व सुव्यवस्था, हाथरसचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना नोटीस बजावण्यात आलीय. पुढील सुनावणीसाठी त्यांना समन्स बजावण्यात आलेआहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:42 AM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here