राजापूर अर्बन बँकचे शेड्युल्ड बँकेमध्ये रूपांतर होईल : अशोक गार्डी

0

राजापूर : स्वातंत्र्यपूर्वकाळात स्थापन झालेल्या राजापूर अर्बन बँकेने गेल्या ९९ वर्षांत यशस्वी घौडदौड केली असून यावर्षी शतकमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केले आहे. बँकेची आतापर्यंतची यशस्वी घोडदौड पाहता लवकरच तिचे शेड्युल्ड बँकेमध्ये रूपांतर होईल, असा विश्वास सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक अशोक गार्डी यांनी व्यक्त केला. राजापूर अर्बन बँकेच्या शतकमहोत्सवी वर्षाला १ ऑक्टो.पासून शुभारंभ झाला असून त्याचे औचित्य साधून गुरुवारी राजापूरच्या मातोश्री सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. बँकेचे अध्यक्ष जयंत अभ्यंकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर माजी आमदार गणपत कदम, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, स्वामी स्वरूपानंद सहकारी पतपेढीचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे, जिल्हा बँकेचे संचालक मनोहर सप्रे, बँकेच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष रवींद्रनाथ ठाकूरदेसाई, बँकेचे उपाध्यक्ष सुनील जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here