आमदार राजन साळवी यांनी राजापूर मतदारसंघातील प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे वेधले लक्ष

0

रत्नागिरी : कोकणातील विविध प्रश्न आणि विकासकामांसंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत आमदार राजन साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. मागणी असलेल्या सुपर मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाला मंजुरी देऊन त्याची मुंबई-गोवा महामार्रावरील ओणी येथे उभारणी व्हावी, अशी मागणी साळवी यांनी केली. बैठकीमध्ये कोकणातील विविध प्रश्नांकडे लक्ष वेधताना आमदार साळवी यांनी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका कोविड सेंटरमध्ये डॉक्टर, फिजिशियन, नर्सेस, टेक्निशियन, क्लार्क यांची भरती प्रक्रिया, प्राथमिक आरोग्य केंद्र सक्षमीकरण, महामार्गावर एखादा मोठा अपघात झाल्यास मुंबई किंवा पुणे येथे रुग्णांना घेऊन जाण्यासाठी १०८ रुग्णवाहिका, ती मुंबईसारख्या मोठ्या शहरांमध्ये जाण्यास उपलब्ध करून देणे, कोविड-19 रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार वाढविणे आदी मागण्यांचा समावेश आहे. राजापूर तालुक्यातील पंचक्रोशी ग्रामविकास मंडळातर्फे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने मागणी केली जात असलेले सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्वरित उभारले जावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. त्यांच्या या मागण्यांना मुख्यमंत्री ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे साळवी यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:09 PM 02-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here