दुचाकीची एसटीला धडक; स्वारावर गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : दुचाकी बेदरकारपणे चालवून एसटीला धडक देणाऱ्या स्वाराविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. कमलेश संतोष कदम (वय २६, साई सुनंदा अपार्टमेट, शांतिनगर, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना २५ सप्टेंबरला सायंकाळी सहाच्या सुमारास माळानाका येथील अंबिका हार्डवेअर दुकानासमोर डिव्हाडरजवळ घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दुचाकी (एमएच-०८एएम-१०९६) घेऊन रत्नागिरीकडे येत असताना माळनाका येथे दुचाकी निष्काळजीपणे चालवून एसटी स्टँडकडे जाणारी एसटीच्या (एमएच-१४बीटी-१७६३) चालकाच्या बाजूस पुढील चाकाचे मागील बाजूस धडक दिली. यामध्ये स्वार स्वतः जखमी झाला. दुचाकी व एसटीचे नुकसान झाले. या प्रकरणी पोलिस नाईक रुपेश भिसे यांनी शहर पोलिसात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी स्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल कोकरे करत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:22 AM 03-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here