ब्रेकिंग : रत्नागिरी शहरात बिबट्याचा वावर

0

रत्नागिरी : शहरातील आय. टी. आय. परिसरात काहीजणांना बिबट्याचे दर्शन झालं आहे. येथे जवळच राहणारे कीर यांच्या पडवीत देखील गणपती उत्सवाच्या काळात बिबट्या येऊन गेलाय. येथील रहिवासी नितीन कीर यांनी आय. टी. आय. च्या मागील बांधावर बिबट्या बसल्याचे पाहिलंय. काल शुक्रवारी नितीन कीर याच परिसरात असणाऱ्या आपल्या बागेत गेले असता त्यांना कुत्र्याचा आवाज व बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज ऐकू आला. जवळच झाडावर बिबट्याने अर्धवट फस्त केलेले माकड अडकलेले देखील त्यांनी पहिले. नितीन कीर तेथून मागे फिरले आणि याची खबर त्यांनी वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या भागाची पहाणी केली व लवकरच येथे कॅमेरे लावणार असल्याचे आश्वासन देण्यात आले. आता बिबट्याचा वावर शहरी भागात होत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
11:28 AM 03/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here