ग्रामीण देवरूखे ब्राह्मण संघाची सर्वसाधारण सभा रविवारी

0

रत्नागिरी : ग्रामीण देवरूखे ब्राह्मण संघ, जाकादेवी-खालगावची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता उल्हास अनंत मुळये यांच्या नेवरेफाटा येथील पॅकहाऊसमध्ये घेतली जाणार आहे. या सभेमध्ये वर्षभरातील मृत ज्ञातीबांधवांना श्रद्धांजली अर्पण करणे, मागील सभेचे इतिवृत्त कायम करणे, या आर्थिक वर्षातील जमा खर्चाचे वाचन व मंजुरी, नियोजित प्रकल्प बांधकामाचा आढावा घेणे व आवश्यकता भासल्यास आराखड्यात बदल करून त्यास मंजुरी घेणे, प्रकल्प निधी संकलनाबाबत चर्चा व नियोजन करणे व ऑडिटरची नेमणूक या विषयांवर चर्चा होणार आहे. या सभेला देवरूखे ज्ञातीबांधवांनी अधिकाधिक संख्येने उपस्थित रहायचे असून कोणालाही विकासात्मक सूचना करावयाची असल्यास ती संदेश श्रीकृष्ण कानडे, c/o उल्हास अनंत मुळये, जाकादेवी (9657258150) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे. मास्क आणि सोशल डीस्टंगसिंग चे पालन काटेकोरपणे करायचे आहे, अशी सूचना करण्यात आली आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 03-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here