हातखंबा येथे आढळला अज्ञाताचा मृतदेह

0

रत्नागिरी : तालुक्यातील हातखंबा येथील एका दुकानसमोर अज्ञात प्रौढाचा मृतदेह आढळून आल्याची घटना गुरुवार दि. १ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वा. सुमारास घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी शर्वरी शिवाजी सनगरे (४०, रा. सनगरेवाडी हातखंबा, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिसांना खबर दिली. त्यानुसार गुरुवारी सकाळी त्या हातखंबा येथील बोंबलेवाडी स्टॉपजवळ आल्या असता तेथील एका दुकानजवळ त्यांना एक प्रौढ बेशुद्धावस्थेत दिसून आला. बराच वेळ झाला तरीही त्याने कोणतीही हालचाल न केल्याने सनगरे यांनी त्या प्रौढाला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यानंतर त्यांनी तातडीने या बाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. या प्रकरणी अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल झगडे करीत आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 03-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here