लांजा : तालुक्यातील जावडे रोड येथील १२ वर्षीय मुलाने साडेचार वर्षाच्या बालिकेवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लांजा पोलिसांनी या मुलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जावडे रोड येथील एका फार्म हाऊसजवळ गुरुवारी दुपारी हा प्रकार घडला. गुरुवारी दुपारी काही मुले त्या फार्म हाऊसजवळ खेळत असताना या १२ वर्षांच्या मुलाने या बालिकेला सोबत नेऊन हे कृत्य केले आहे. रात्री या बालिकेच्या पालकांना ही गोष्ट समजल्यानंतर या प्रकरणी लांजा पोलिस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यावर त्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:04 PM 03-Oct-20