ओव्हरटेक केल्याच्या रागातून टँकरचालकाला मारहाण

0

राजापूर : ओव्हरटेक केल्याच्या रागातून एका टँकरचालकाच्या अंगावर दारू ओतून मारहाण झाल्याची घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या दरम्यान राजापूरच्या नाक्यावर घडली. महामार्गावरून एक टँकर भरधाव वेगाने येत होता. त्यावेळी एक वाहनचालक महामार्गावरून चालला होता. त्यावेळी त्या टँकरने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. त्याचा राग त्या वाहनचालकाला आला व त्याने तत्काळ त्या टँकरला थांबविले. त्याच्याशी हुज्जत घालायला सुरुवात केली. त्यानंतर अचानक संतापलेल्या त्या वाहनचालकाने त्या टँकरवाल्याच्या अंगावर दारू ओतली व त्याला मारहाण केली. दरम्यान, यानंतर काहींनी हस्तक्षेप करून प्रकरण मिटवले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 03-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here