‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अंतर्गत जिल्ह्यातील 9 लाख 69 हजार जणांची तपासणी

0

रत्नागिरी : राज्य शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या उपक्रमांतर्गत स्थापन केलेल्या 564 आरोग्य पथकांच्या माध्यमातून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 लाख 69 हजार जणांचे सर्वेक्षण पूर्ण झाले. यामध्ये अतिगंभीर आजार असलेले (कोमॉर्बिड) 76 हजार 684 रुग्ण असून त्यांची काळजी घेण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे आहे. कोरोनाशी निगडीत लक्षणे असलेल्या 598 जणांच्या अँटिजेन टेस्ट करण्यात आल्या असून त्यात 143 पॉझिटिव्ह तर 169 सारीचे रुग्ण सापडले. या मोहिमेला 15 सप्टेंबरपासून सुरूवात झाली असून, 25 ऑक्टोबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:02 AM 05-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here