स्मार्ट कार्डसाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत

0

चिपळूण : चिपळूण ग्राहक पंचायतीच्या मागणीनुसार राज्य परिवहन महामंडळाने राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात स्मार्ट कार्डसाठी पूर्वीप्रमाणेच एसटी सुविधा उपलब्ध केली आहे. दरवर्षी चार हजार कि.मी. प्रवास सवलतीच्या दरात करण्याबाबतची अट काही महिन्यांपूर्वी घालण्यात आली होती. ती आता रद्द करण्यात आली आहे. तसेच स्मार्ट कार्ड काढण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. याचा फायदा राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना होणार असल्याची माहिती अ. भा. ग्राहक पंचायत चिपळूणचे अध्यक्ष सीताराम शिंदे यांनी दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:01 PM 05-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here